प्रतिनिधी: अभिमन्यू वेंगुर्लेकर
सिंधुदुर्ग- आ.नितेश राणे यांच्यासंदर्भात मोठा निर्णय समोर आला आहे. राणेंना सर्वोच्च न्यायालयाने तत्काळ दिलासा दिला होता. मात्र पुन्हा जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला. यानंतर राणेंना दहा दिवसांच्या आत शरण येण्याचे आदेश देण्यात आले होते. अखेर राणेंनी शरणागती पत्कारल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. सत्र न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांचा जामीनाचा मार्गही मोकळा होण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारी पक्षाने त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी लावून धरली आहे.
दिवसभरात कोर्टात उहापोह झाल्यानंतर आ.नितेश राणेंनी शरणागती पत्कारणार असल्याचं सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेऊन मी कणकवलीच्या दिवाणी न्यायालयात दाखल होत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यसरकाने बेकायदेशीरपणे मला अटक करण्याचा प्रयत्न केला. त्याचा निषेध करत असल्याचं राणेंनी म्हटलंय.कोर्टाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे राणेंना आजची आणि उद्याची रात्र कणकवली पोलीसांच्या कोठडीतच काढावी लागणार आहे.
शिवसेना नेते संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी सध्या भाजपाचे आमदार नितेश राणे न्यायलयाच्या फेऱ्या मारत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर त्यांना शरण येण्याचा एकमेव मार्ग उरला होता. अखेर त्यांनी तो पत्कारल्याचं दिसतंय.याआधील जिल्हा न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला असल्याने ते जामीनसाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार होते. मात्र उच्च न्यायालयासमोरील अर्जही निवेदनासह मागे घेण्यात आला असल्याची माहिती त्यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली.कणकवली दिवाणी न्यायालयात सुनावणी सुरु असल्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दंगल नियंत्रण पथक न्यायालयाबाहेर तैनात होते.