रत्नागिरी– गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा मळभी वातावरण कोकण किनारी भागात तयार झाले असून, आगामी दोन दिवस किनारपट्टी भागात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आगामी 24 तासांनंतरच वातावरणीय बदलाची शक्यता असून, या कालावधीत हलक्या पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सलग चौथ्या महिन्यातही अवकाळी पावसाचे सावट असल्याचे नमूद केले आहे.
5 आणि 6 फेब्रुवारीला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, अशी माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. यामुळे या ठिकाणी काहीशी कमी झालेली थंडी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे.


