मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांनी कोरोना आणि न्यूमोनियावर मात केली आहे. त्या काही काळ व्हेंटिलेटरवर होत्या, पण आता त्यांचे व्हेंटिलेटरही काढून टाकण्यात आले आहे. 15 दिवसांच्या उपचारानंतर त्या व्हेंटिलेटवर नाही. त्यांना फक्त ऑक्सिजन दिला जात आहे. लता दीदी सतत डोळे उघडत आहेत. कोरोनामुळे त्या थोड्या अशक्त झाल्या आहेत असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पाच दिवसांपूर्वी सांगितले होते.
परंतु नुकत्याच आलेल्या माहितीनुसार लता दीदींची तब्येत खालावली असून चाहते त्या लवकर बऱ्या व्हाव्यात, अशी सदिच्छा व्यक्त करत आहेत. लता दीदींच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी त्यांची बहीण आशा भोसले आणि भाऊ हृदयनाथ मंगेशकर हेही रुग्णालयात पोहोचले आहेत. जवळपास दोन तास आत राहिल्यानंतर दोघे म्हणाले, दीदी बऱ्या आहेत, तुम्ही सर्व प्रार्थना करा.

