मुंबई- गानसम्राज्ञी लता मंगेशकर यां वयाच्या 92 व्या वर्षी गानकोकिळेने या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे 8 जानेवारीपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूत त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या फुफुसांनाही संसर्ग झाला होता.
आठवड्याभरापूर्वी त्यांनी कोरोनावर मात केली होती आणि त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली होती. पण शनिवारी पुन्हा एकदा त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आल्याचे वृत्त आले.त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीसह देशात शोककळा पसरली आहे.
गोव्याच्या मंगेशी गावातील मंगेशकर कुटुंबातील लतादीदींचा जन्म 28 सप्टेंबर 1929 ला मध्यप्रदेशच्या इंदोर शहरात एका मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.वयाच्या पाचव्या वर्षी लता दीदींनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली होती. त्यांनी हजारांहून अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली आहेत.लतादिदींनी आपल्या जादुई आवाजाच्या जोरावर ‘गानकोकिळा’ अशी बिरुदावली आपल्या नावासमोर मिळवली आणि भारत रत्नसह पद्म विभूषण, पद्म भूषण आणि दादासाहेब फाळके अवार्ड सारख्या अनेक पुरस्कार मिळवले.


