गानसम्राज्ञी लता मंगेशकर च्या निधनाने एका स्वर युगाचा अस्त झाला आहे.सैन्यदलाकडून यावेळी दीदींना मानवंदना देण्यात आली. लता दीदी यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांना मुखाग्नी दिला. शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात दीदींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आज दुपारी एकच्या सुमारास ब्रीच कँडी रुग्णालयातून प्रभूकुंज या त्यांच्या निवासस्थानी दीदींचे पार्थिव आणण्यात आले होते. येथे काही काळ त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले गेले. दीदींच्या घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील प्रभूकुंजवर हजर होते. महानायक अमिताभ बच्चन त्यांची कन्या श्वेता बच्चनसह दीदींचे अंत्यदर्शन घेतले.
फुलांनी सजवण्यात आलेल्या ट्रकमधून दीदींचे पार्थिव शिवाजी पार्कवर आणण्यात आले. दीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.. त्यांच्यासह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे हेदेखील पोहोचले. नरेंद्र मोदी यांनी लता दीदींना श्रद्धांजली वाहिली आणि मंगेशकर कुटुंबीयांचे सांत्वन केले.


