परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम सुरु असतानाच दरड कोसळली, दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी

0
70
परशुराम घाटाच्या माथ्याशी व पायथ्यशी असलेल्या घरांचे लवकरात लवकर पुनर्वसन करा-सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर

चिपळूण- मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम सुरु असतानाच दरड कोसळल्याची भीषण घटना मंगळवारी सकाळी 10.45 वाजता घडली. या दरडीखाली दोन पोकलेन व त्यांचे चालक अडकले आहेत. घटनास्थळी मदतीसाठी तात्काळ अन्य यंत्रणा दाखल झाली आहे.

या घाटातील मध्यवर्ती ठिकाणी चौपदरीकरणा अंतर्गत डोंगर कटाई सुरु आहे. त्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा कामी लागली आहे. रस्त्याच्या वरील बाजूस पोकलेनने खोदाई केली जात असतानाच बाजूचा डोंगराचा भाग खाली आला. त्यामध्ये दोन पोकलेन अडकले. तसेच त्याचे चालकही त्यामध्ये अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी अन्य पोकलेन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून दरड हटवण्याचे काम सुरू आहे. तसेच अन्य यंत्रणा ही दाखल झाली आहे. या घटनेमुळे घाटात दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here