एकता कपूरच्या आगामी रिअॅलिटी शो ‘लॉक अप’ अल्ट बालाजी आणि एमएक्स प्लेअरवर येत आहे. कंगना राणावत हा शो होस्ट करणार आहे. एकता कपूरने या शोमध्ये सहभागी होण्यासाठी कंगनाला मोठी रक्कम दिली आहे.कंगना प्रति एपिसोड सुमारे 1 कोटी रुपये घेत असल्याची माहिती हाती आली आहे.
मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटी परिसरात या शोचा सेट तयार करण्यात आला आहे. शोचा पहिला एपिसोड 27 फेब्रुवारीला येणार आहे, ज्यासाठी कंगना एक दिवस आधी 26 फेब्रुवारीला शूट करणार आहे.


