एमएचटी सीईटी-२०२२ ऑनलाईन नोंदणी अर्ज दि. १० फेब्रुवारी ते ३१ मार्च, २०२२ या कालावधीत भरण्याचे आवाहन

0
88

मुंबई, दि. 10 : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी / तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी-२०२२ ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.

या परीक्षेकरीता उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी अर्ज दि. १० फेब्रुवारी, २०२२ ते ३१ मार्च, २०२२ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत. अर्ज सादर करण्याकरिता  आणि अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी, असे  राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here