प्रतिनिधी : अभिमन्यू वेंगुर्लेकर
रत्नागिरी- रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथील आंबा बागायतदार शशिकांत शिंदे यांच्या बागेतून सात हापूस आंबा पेट्या अहमदाबाद येथे रवाना झाल्या. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आंबा पेट्या पाठवण्याचे त्यांचे हे सातवे वर्ष आहे.
गणेशगुळे येथील शिंदे अनेक वर्ष आंबा व्यवसायात कार्यरत आहेत त्यामुळे मोठया प्रमाणात हापूस कलमांची लागवड त्यांनी केलेली आहे. सुरवातीच्या काळात पाडव्याच्या मुहूर्तावर आंबा परजिल्ह्यात पाठवण्याची पद्धत होती. परंतु बदलत्या हवामानाचा व वातावरणाचा अंदाज घेऊन त्यांनी बागेमध्ये केलेली मेहनत त्याला मिळालेली वातावरणाची साथ यामुळे गेली.
सहा वर्ष जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये पहिली हापूस आंबा पेटी पाठवण्याचा मान ते मिळवत आहेत. त्यामुळे या वर्षाताही पहिली हापूस आंबा पेटी बाहेरच्या मार्केटला पाठवण्याचा मान त्यांना मिळालेला आहे


