भारतातही आता ई पासपोर्टधारकांची संख्या वाढणार आहे. यामुळे बनावट पासपोर्टला पूर्ण आळा बसणार आहे. देशाची सुरक्षा पूर्वीपेक्षा अधिक भक्कम राहण्यास मदत होणार असून आगामी काही दिवसांत ई-पासपोर्टच ग्राह्य होईल. नाशिक येथील इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये ई पासपोर्ट तयार करण्यासाठी मान्यता मिळाली आहे.
ई पासपोर्टमध्ये संबंधित व्यक्तीची पूर्ण माहिती राहणार असून त्यामुळे त्याच्या पासपोर्टवर पत्ता, कोणत्या देशात किती वेळेस गेला याचीही माहिती उपलब्ध होणार आहे. नागरिकांचा वेळ वाचणार आहे. सध्या नाशिक येथील इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ई-पासपोर्ट तयार करण्यात येत आहेत.
ई-पासपोर्ट तयार करताना पूर्वीच्या पासपोर्टप्रमाणे त्यावर अशोक स्तंभ राहणार आहे. पासपोर्टमध्ये इलेक्ट्रिक चिप असणार आहे. ज्या व्यक्तीचा पासपोर्ट आहे त्या व्यक्तीच्या बोटांचे ठसे व परिपूर्ण माहिती राहणार आहे. ही चिप स्कॅन केल्यानंतर पासपोर्टधारकाची संपूर्ण माहिती संगणकावर दिसणार आहे.


