सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यात विकास कामांचा धडाका सुरूच; १० कोटींच्या रस्त्यांच्या कामांची आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजने व उदघाटने

0
111

आ. वैभव नाईक यांनी रस्ते दुरुस्तीची घेतलेली जबाबदारी पार पाडण्यात यश

प्रतिनिधी पांडुशेठ साठम

कुडाळ: कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या कुडाळ तालुक्यातील १० कोटींच्या रस्त्यांच्या कामांची भूमिपूजने व उदघाटने आज त्यांच्या हस्ते करण्यात आली. अतिवृष्टीमुळे कुडाळ मालवण तालुक्यातील रस्ते खराब झाल्याने रस्ते दुरुस्तीची मागणी होत होती त्यावेळी रस्ते दुरुस्तीची जबाबदारी आ. वैभव नाईक यांनी घेतली होती. त्यातील काही कामे पूर्णत्वास गेली आहेत तर काही कामे येत्या काळात पूर्णत्वास जाणार आहेत. ही जबाबदारी पार पाडण्यात आ.वैभव नाईक यांना यश आले आहे.

यामध्ये चौके धामापूर कुडाळ रस्ता प्रजिमा ४१ डांबरीकरण करणे निधी ६ कोटी ४९ लाख, राज्य मार्ग १७ ते पिंगुळी नेरूर जकात मानकादेवी मार्ग प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ४६ मध्ये डांबरीकरण करणे निधी १ कोटी १० लाख, नेरूर वालावल चेंदवण कवठी रस्ता प्रजिमा ४५ मध्ये डांबरीकरण करणे ३ कोटी या कामांचा समावेश आहे.

याप्रसंगी कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, नेरूर सरपंच शेखर गावडे, कवठी सरपंच रुपेश वाड्येकर,रुपेश पावसकर,राजू गवंडे, ग्रामपंचायत सदस्य प्रसाद गावडे,भक्ती घाडी,माधवी गावडे व रोहिदास चव्हाण, विजय लाड,पिंटू गावडे,मंगेश बांदेकर,दशरथ गावडे, भूपेश चेंदवनकर, विनय गावडे,प्रभाकर गावडे, रामा कांबळी,प्रसाद पोईपकर,यश चव्हाण,सुमित गावपदाधिकारी, शिवसैनिक बांधकाम विभागाचे अभियंता,कर्मचारी उपस्थित होते.

     डे,महिला 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here