सिंधुदुर्ग : वैभववाडी रोटरी क्लबचा पदग्रहण व सनद प्रदान सोहळा दिमाखात संपन्न

0
30

प्रतिनिधी वैभववाडी (मंदार चोरगे)

वैभववाडीतील अपंग बांधवाला व्हिल चेअर प्रदान करत रोटरी क्लब वैभववाडीच्या कार्याचा प्रारंभ

वैभववाडी रोटरी क्लब चा पदग्रहण व सनद प्रदान सोहळा काल वैभववाडी येथे दिमाखात संपन्न झाला. शासकीय विश्रामगृहापासून रॅली काढून कार्यक्रमाला सुरुवात झाली. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर गौरीश धोंड व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत वैभववाडी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी रोटरी क्लब ऑफ वैभववाडी च्या दिशादर्शक फलकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या दिग्गज रोटरीयन यांचे वैभववाडी रोटरी परीवारातर्फे औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
कु. समृद्धी सुनील रावराणे या विद्यार्थीनीने आपल्या नृत्य आविष्कारातून गणरायाला वंदन केले. विश्वशांततीसाठी संपूर्ण रोटरी परीवाराकडून यावेळी स्तब्धता पाळण्यात आली. त्यानंतर कणकवली रोटरीचे प्रेसिडेंट विद्याधर तायशेटे यांना डिस्ट्रिक्ट गव्हर्नर गौरीश धोंड यांच्या हस्ते कॉलर प्रदान केली व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. चिफ गेस्ट व डिस्ट्रिक्ट गव्हर्नर गौरीश धोंड व इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन “तमसो मा ज्योतिर्गमय” या उक्तीप्रमाणे वैभववाडीला एका प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी तयार असलेल्या वैभववाडी रोटरी क्लबच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रम प्रसंगी बोलताना कणकवली रोटरी प्रेसिडेंट विद्याधर तायशेटे यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या गोवा, कर्नाटक, कोल्हापूर, कणकवली, सावंतवाडी, कुडाळ, मालवण, देवगड, शिरोडा, वेंगुर्ला येथील रोटरीयन यांचे स्वागत करुन वैभववाडी रोटरी क्लबची स्थापना करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले, परिश्रम घेतले त्या सर्वांचे आभार मानले व वैभववाडी रोटरी क्लबच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या व आपण सदैव तुमच्या सोबत आहोत असा विश्वास व्यक्त केला.
पदग्रहण व सनद प्रदान सोहळ्याला उपस्थित असलेल्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर गौरीश धोंड, फर्स्ट लेडी प्रतिमा धोंड, असिस्टंट गव्हर्नर शशिकांत चव्हाण, राजेश काठवड तसेच नुतन वैभववाडी रोटरी क्लब प्रेसिडेंट संतोष टक्के, सलोनी टक्के, चार्टर प्रेसिडेंट सेक्रेटरी संजय रावराणे, ट्रेझरर प्रशांत गुळेकर, वैभववाडी नुतन नगराध्यक्ष नेहा माईनकर यांचा परिचय करून देण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा वैभववाडी रोटरी क्लबच्या वतीने शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या गोवा, कर्नाटक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोटरीयन यांच्या उपस्थित वैभववाडी रोटरीचे प्रेसिडेंट संतोष टक्के, चार्टर प्रेसिडेंट सेक्रेटरी संजय रावराणे ट्रेझरर प्रशांत गुळेकर तसेच मुकुंद रावराणे, मनोज सावंत, मंगेश कदम, विद्याधर सावंत, सचिन रावराणे, गणेश मसुरकर, शैलेंद्र परब, डॉ.दिपा पाटील, सलोनी टक्के, स्नेहल रावराणे,समिता कुडाळकर, पुजा सावंत,ॲड. विवेक गोखले, संजय सावंत, संदिप पाटील, गंगाधर केळकर, सुर्यकांत धावले, नामदेव गवळी, महेश संसारे, मंदार चोरगे, तेजस आंबेकर, विजय महाडिक, संदिप पाटील, प्रशांत कुळये, प्रशांत ढवण, मंगेश चव्हाण, सुनिल कुंभार, सुर्यकांत पाटील, अरविंद गाड, रोहन रावराणे, सुनिल रावराणे, शरद नारकर, शैलेश भोवड,बाबाजी पारकर, सचिन सावंत, सुरेंद्र नारकर या वैभववाडी रोटरी क्लबच्या सदस्यांना डिस्ट्रिक्ट गव्हर्नर गौरीश धोंड यांच्या हस्ते रोटरी पिन देउन वैभववाडी रोटरी क्लबचा पदग्रहण व सनद प्रदान सोहळा दिमाखात संपन्न झाला. यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर गौरीश धोंड,असिस्टंट गव्हर्नर शशिकांत चव्हाण, राजेश काठवड, वैभववाडी प्रेसिडेंट संतोष टक्के, नगराध्यक्ष नेहा माईनकर, उपनगराध्यक्ष रोटरीयन संजय सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रिदम प्ले स्कुल च्या विद्यार्थ्यांनी पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. अतिशय नयनरम्य व शिस्तबद्ध अशा कार्यक्रमाची वैभववाडीवासीयांकडून प्रशंसा होताना दिसत आहे.
वयाच्या अवघ्या २४-२५ व्या वर्षी वैभववाडी शहराच्या विकासाची नवनवी स्वप्नं पाहणाऱ्या वैभववाडी शहराच्या नुतन नगराध्यक्ष नेहा माईनकर यांचा व उपनगराध्यक्ष आणि रोटेरीयन संजय सावंत यांचा गोवा, कर्नाटक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपस्थित रोटरी क्लब च्या सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सन्मान करुन यांच्या कार्याला लाख लाख शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रम प्रसंगी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या कार्यामध्ये सहभागी असलेले वैभववाडी तालुक्याचा एक स्वाभिमान असलेले नाधवडे गावचे स्वातंत्र्य सेनानी कै.शंकर धोंडू कांबळे हे अठराव्या वर्षी आझाद हिंद सेने मध्ये सहभागी झाले होते त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुरुंगवास देखील भोगलेला होता. १९८८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते त्यांना ताम्रपट देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला होता. स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या सहचारिणी
पार्वती शंकर कांबळे यांचा रोटरी परीवाराने यावेळी सन्मान केला. या बरोबरच वैभववाडी रोटेरियन संदीप धोंडू पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा देखील गौरव करण्यात आला. कोरोना काळात वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात यशस्वी रित्या जबाबदारी पार पाडणारे कर्मचारी स्वप्नील शशिकांत रेवडेकर यांच्या कार्याची दखल घेऊन रोटरी क्लब वैभववाडी च्या वतीने कोविड योद्धा म्हणून त्यांना गौरविण्यात आले.
रोटरी क्लब वैभववाडी च्या या सोहळ्याचा एक विशेष प्रसंग म्हणजे रोटरी परीवाराचा ‌ एक मदतीचा हात म्हणून प्राथमिक स्वरूपामध्ये हुसेन लांजेकर यांना व्हिल चेअर प्रदान करून एका वेगळ्या कार्याची मुहूर्तमेढ या समारंभाच्या निमित्ताने रोवली गेली. एका वेगळ्या सामाजिक भावनेने या जिल्ह्यातील विविध रोटरी क्लब ची प्रेरणा घेऊन एका नव्या जोमाने उभी राहणारी रोटरी क्लब वैभववाडी यापुढे वैभववाडी शहर आणि वैभववाडी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा रोटरी परीवार नेहमी सज्ज असेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विविध क्षेत्रांमध्ये जेंव्हा जेंव्हा गरजवंतांना मदतीचा हात लागेल तेंव्हा तेंव्हा तो देण्यासाठी वैभववाडी रोटरी कटिबद्ध राहील. गरजवंतांना नेहमी मदतीचा हात देत रोटरी क्लब जागतिक स्तरावर एक वेगळा आदर्श उभा करेल असा ठाम विश्वास वैभववाडी प्रेसिडेंट संतोष टक्के यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
महाराष्ट्र गोवा व कर्नाटक या तीन राज्यांतील १३९ रोटरी क्लब नंतर १४० वा वैभववाडी रोटरी क्लब स्थापन करण्यात आला. कणकवली रोटरी क्लबचे प्रेसिडेंट विद्याधर तायशेटे व त्यांचे इतर सहकारी रोटरीयन यांनी या क्लबचे पालकत्व स्वीकारले आहे. कणकवली या नावातील तिन अक्षरे म्हणजे ‘कणक’ आणि वैभववाडी मधील तिन अक्षरे ‘वैभव’ म्हणजेच जणू सुवर्णा च्या सहकार्याच्या स्पर्शातून वैभववाडी रोटरी क्लबची स्थापना झाली हे विशेष असे मत असिस्टंट गव्हर्नर यांनी व्यक्त केले.
वैभववाडीच्या नावाप्रमाणेच वैभव प्राप्त असलेल्या या वैभववाडीला रोटरी क्लबच्या माध्यमातून स्वच्छ व सुंदर बनवूया असे मत डिस्ट्रिक्ट गव्हर्नर गौरीश धोंड यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. ते बोलताना म्हणाले वैभववाडी तालुक्यातील सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रात रोटरी क्लबच्या माध्यमातून लोकहिताचे विविध उपक्रम आपण राबवा संपूर्ण रोटरी परीवार आपल्या पाठीशी उभा राहिला असा विश्वास यावेळी त्यांनी वैभववाडी रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांना दिला. यावेळी कणकवली प्रेसिडेंट विद्याधर तायशेटे व नितीन बांदेकर यांना गव्हर्नर ची स्पेशल रोटरी पिन लावून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर गौरीश धोंड यांनी सन्मानीत केले.
या कार्यक्रम प्रसंगी बोलताना असिस्टंट गव्हर्नर शशिकांत चव्हाण यांनी सर्व प्रथम नुतन वैभववाडी रोटरी क्लब च्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले. आज पासून वैभववाडी रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांचे करिअर मधील एक व रोटरी परीवारात सामील झाल्यानंतर आता आपण करत असलेल्या कार्याचा एक असे दोन बायोडाटे तयार होतील. रोटरी क्लबच्या माध्यमातून तुम्हाला एक वेगळी ओळख मिळेल असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. तर रोटेरीयन इंटरनॅशनल प्रशांत शेखर मेहता यांचे रोटरी व रोटरी क्लबचे कार्य सर्वदूर पोहोचवण्याच्या संकल्पाला आपण सर्वांनी सहकार्य करुन त्यांचा तो संकल्प यशस्वी करूया असे आवाहन दुसरे असिस्टंट गव्हर्नर राजेश घाटवल यांनी उपस्थित सर्व रोटरीयन यांना केले.
विविध जिल्ह्यातील क्लब च्या प्रेरणेतून रोटरी क्लब वैभववाडी हे पहिलं वहिलं विकासाचं बिज अंकुरताना त्याचे सर्वांनी स्वागत केले. या नयनरम्य अशा कार्यक्रम प्रसंगी वैभववाडीचे प्रेसिडेंट संतोष टक्के आपले मनोगत व्यक्त करत होते त्यांनी वैभववाडी रोटरी परीवाराला आशिर्वाद देण्यासाठी व सहकार्य करण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या गोवा, कर्नाटक ,कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रोटेरियन यांना धन्यवाद दिले. ते म्हणाले रोटरी म्हणजे मोठ्या माणसांची एक सामाजिक संस्था अशी सर्वसाधारण इतरांप्रमाणेच माझी धारणा होती परंतु गेले काही दिवस रोटरी क्लबच्या अनेक दिग्गज मंडळींबरोबर वावरताना रोटरी म्हणजे नेमके काय हे मला समजून चूकले. पणजी येथे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर गौरीश धोंड सरांची भेट घेतली तेव्हा त्यांनी माझ्या खांद्यावर टाकलेला हात मला एक चैतन्य,स्फुर्ती देऊन गेला. वैभववाडी रोटरी क्लब वर आपण सर्वांनी टाकलेला विश्वास आम्ही १००% सार्थकी लावू असे अभिवचन त्यांनी संपूर्ण उपस्थित रोटरी परीवाराला दिले.
आपला व्यवसाय, आपले कुटुंब मग रोटरी ही रोटरीची व्याख्या पुर्ण करण्याचा यशस्वी प्रयत्न करु असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. वैभववाडीच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक पदाची कोणतीही लालसा न बाळगता आमच्या सोबत आहेत असे ते म्हणाले. वैभववाडी रोटरी क्लब स्थापन करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. वैभववाडी रोटरी क्लबच्या उभारणीत अत्यंत बारकाईने लक्ष ठेवलेल्या नितीन बांदेकर यांच्या प्रती देखील त्यांनी ऋण व्यक्त केले. डॉ.विद्याधर तायशेटे यांनी वैभववाडी रोटरी क्लबचे पालकत्व स्वीकारले. एका डॉक्टरनी आमचे पालकत्व घ्यावं ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असल्याचे संतोष टक्के यांनी यावेळी सांगितले. आपला व्यवसाय वृद्धींगत करण्यासाठी व मैत्री वाढण्यासाठी रोटरी चा सर्वांना फायदा होईल शिवाय वैभववाडी सारख्या छोट्याशा शहरात रोटरी क्लब स्थापन करण्याचे पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण होताना खूप आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी चिफ गेस्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर गौरीश धोंड, फर्स्ट लेडी प्रतिमा धोंड, असिस्टंट गव्हर्नर शशिकांत चव्हाण,राजेश घाटवल, कणकवली प्रेसिडेंट विद्याधर तायशेटे, वर्षा बांदेकर,नितिन बांदेकर, वैभववाडी नगराध्यक्षा नेहा माईनकर याच बरोबर नुतन वैभववाडी रोटरी क्लबचे सर्व सदस्य, कणकवली, सावंतवाडी, कुडाळ,मालवण,देवगड, शिरोडा, वेंगुर्ला तसेच गोवा ,कर्नाटक, कोल्हापूर येथील रोटेरीयन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here