मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या ‘अधीश’ या बंगल्यामध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार मुंबई महानगरपालिकेत दाखल झाली होती.मुंबईतील जुहू परिसरातील तारारोड येथील या बंगल्याच्या बांधकामामुळे सीआरझेड नियमांचे उल्लंघन होत आहे अशी ती तक्रार आहे. त्यावर अंमलबजावणी करत मुंबई महापालिकेने तपासणी करण्यासाठी ही नोटीस बजावली आहे.
महापालिकेच्या के पश्चिम विभागाच्या बिल्डिंग प्रपोजल विभागाचे पथकाकडून आज राणेंच्या बंगल्याची तपासणी करण्यात णार आहे. सदर परिसराची पाहणी करून मोजमाप घेण्यात येणार असून बंगल्याची कागदपत्र घेऊन तिथे हजर राहावे यासाठी पालिकेने नारायण राणेंना नोटीस बजावली आहे.


