सिंधुदुर्ग: भाजपचे निरोम सोसा. संचालक सुभाष मांजरेकर यांच्यासह नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश

0
70
भाजपचे निरोम सोसा. संचालक सुभाष मांजरेकर यांच्यासह नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश

प्रतिनिधी पांडुशेठ साठम

कणकवली: भाजपचे निरोम सोसायटी संचालक सुभाष मांजरेकर यांच्यासह निरोम मांजरेकरवाडीतील अनेक नागरिकांनी आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. कणकवली विजय भवन येथे शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. सुभाष मांजरेकर यांनी निरोम सोसायटी संचालक बरोबरच उपसरपंच, पोलीस पाटील हि पदे भूषविली असून निरोम गावचा विकास करण्यास भाजप कमी पडत असल्याने त्यांनी गावच्या विकासासाठी आमदार वैभव नाईक यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला आहे.

यामध्ये निरोम मांजरेकरवाडीतील जगन्नाथ साटम, आबा मांजरेकर, सचिन आचरेकर, प्रकाश साटम,आशा जाधव, रेश्मा आचरेकर, प्रमिला साटम, प्राची आचरेकर, विजया मांजरेकर यांनी आज शिवसेनेचा भगवा हाती घेतला.

यावेळी उपतालुकाप्रमुख बाबा सावंत, विभाग संघटक संतोष घाडी, माजी विभागप्रमुख दीपक राऊत,अरुण लाड, संजय पारकर, सुदाम राऊत, शाखा प्रमुख विनायक राऊत, उपशाखा प्रमुख प्रल्हाद राऊत, विश्वास आचरेकर, गणेश आचरेकर, दीपक सावंत, अभिमन्यू येरम आदी शिवसैनिक उपस्थित होते.आमदार वैभव नाईक यांनी बांधले शिवबंधन

     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here