सिंधुदुर्ग: संत राऊळ महाराज महाविद्यालयात पथनाट्यातून स्त्री संरक्षण,पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत शिवजयंती उत्साहात साजरी

0
84
शिवजयंती साजरी करताना संत राऊळ महाराज महाविद्यालयात विद्यार्थी देत आहे पथनाट्यातून स्त्री संरक्षण,पर्यावरण संरक्षणाचा संदेश

प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
कुडाळ : दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त संत राऊळ महाराज महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत स्त्री संरक्षण तसेच पर्यावरण संवर्धन या संदर्भातील छत्रपती शिवाजीराजांची भूमिका या विषयावर स्वयंसेवक विद्यार्थांमार्फत एस.एन.देसाई चौक येथे पथनाट्याचे आयोजन करण्यात आले.

स्वराज्यामध्ये शिवरायांनी स्त्रियांवर अन्याय करणाऱ्यांना वेळीच शासन केले तसेच स्व:कृतीतून पर-स्त्री ही मातेसमान असते हे शिवरायांनी दाखवून दिले. परंतु आजच्या काळात अन्यायग्रस्त स्त्रीला न्यायासाठी वर्षानुवर्षे ही वाट पाहावी लागते. यामुळे शिवरायांसारखे न्यायप्रिय व शिवरायांचा वारसा पुढे नेणारे असे शासक आजच्या घडीस जन्माला यायला हवे अशी आकांक्षा व्यक्त करण्यात आली. स्त्री संरक्षणा बरोबरच पर्यावरण तसेच वृक्ष संवर्धनाविषयी शिवाजीराजे हे कसे जागरूक होते याचेही उदाहरण हे पथनाट्यातून देण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी वृक्ष संवर्धनानिमीत्त काढलेले आज्ञापत्र हे वाचून दाखवण्यात आले. यावेळी वृक्ष संवर्धनाची जबाबदारी ही प्रत्येकाने घेतलीच पाहिजे अशी प्रतिज्ञा करण्यात आली.

स्वयंसेवक विद्यार्थी- ईश्वरी कुडाळकर, ऋतुजा वंजारे, ऋतुजा राणे, संचना सिंगनाथ, अक्षय शेलटे, विपुल भावे, अवंतिका कुंभार, श्रावणी साळगांवकर, पंढरीनाथ राणे, समृद्धी पालव, स्नेहल सोनवडेकर, वेदांत सावंत, वैष्णवी गोसावी, वैष्णवी देसुरकर, वैभवी घाडी, मानसी राऊळ, मानसी परब, प्रथमेश दळवी व राहुल परब यांनी पथनाट्य सादर केले.

पथनाट्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे माजी विद्यार्थी गोविंद कोरगांवकर, वैशाली परब, प्रणव हरमळकर, योगिता पालव, राकेश वस्त व सीमा मुंडले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. डिसले हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली.
राष्ट्रीय छात्र सेना विभागातर्फे शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वयंसेवक विद्यार्थी कु. अमिषा गावडे हिने केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक प्रा.उमेश कामत यांनी केले. या कार्यक्रमास कार्यक्रम अधिकारी श्रीमती. सबा शहा, एन.सी सी. विभाग प्रमुख लेफ्ट. डॉ.एस. टी.आवटे, स्टाफ सेक्रेटरी प्रा. डॉ. व्ही.जी. भास्कर, महाविद्यालयातील विविध विभागातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच स्वयंसेवक विद्यार्थी हे मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here