प्रतिनिधी – पांडुशेठ साठम
रोख रक्कमेचे दिले बक्षीस, माठेवाडा स्वराज्य मित्रमंडळाच्या शिवजयंती उत्सवास दिली भेट
कुडाळ: स्वराज्य मित्रमंडळ माठेवाडा कुडाळच्या वतीने आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवास कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट दिली.यावेळी मंडळाच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. बिलिमारो ही एकांकिका सादर करून राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविलेल्या कुडाळच्या ढ मंडळी ग्रुपचा आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आ. वैभव नाईक यांनीही बक्षीस स्वरूपात रोख रक्कम देऊन त्यांच्या कलेचा गौरव केला.
याप्रसंगी सुनील पवार, कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष आफरिन करोल,उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, शिवसेना नगरसेवक संतोष शिरसाट, उदय मांजरेकर,किरण शिंदे,श्रेया गवंडे, अक्षता खटावकर, श्रृती वर्दम,ज्योती जळवी, सुंदर सावंत आदी उपस्थित होते.


