सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या घटली

0
124

ओरोस: देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ५५ हजार ५८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.सध्यस्थितीत जिल्ह्यात २०४ रुग्ण कोरोनाबाधित आहेत.त्यांच्यावर उपचार चालू आहेत .आज जिल्ह्यात एकूण ६ रुग्णांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांनी दिली आहे

देशात 24 तासांत कोरोना संसर्गाचे 21,016 नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान 325 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, जो फेब्रुवारीतील सर्वात कमी आहे. देशात आतापर्यंत 4.28 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याच वेळी, 5.11 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here