राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यात अपहार केल्याप्रकरणी 5 वर्षांचा तुरुंगवास आणि 60 लाखांचा दंड ठोठावला

0
24
Laluprasad Yadav

रा.ज द. नेते लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यात डोरंडा कोषागारातून 139.35 कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी 5 वर्षांचा तुरुंगवास आणि 60 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रांची सीबीआय कोर्टचे विशेष न्यायाधीश एसके शशी यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही शिक्षा सुनावली. 15 फेब्रुवारी रोजी सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन(कबी)च्या विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती एसके शशी यांनी लालू यादव यांच्यासह शिक्षेवर सुनावणीसाठी आजची तारीख (21 फेब्रुवारी) निश्चित केली होती. या प्रकरणातील अन्य दोषींनाही तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रांची न्यायालय परिसरात बिहारमधूनही मोठ्या संख्येने आरजेडी नेते आणि कार्यकर्ते पोहोचले होते.

या प्रकरणी सीबीआयने एकूण 170 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. मात्र 26 सप्टेंबर 2005 रोजी 148 आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले होते. चारा घोटाळ्याच्या चार वेगवेगळ्या प्रकरणांत 14 वर्षांची शिक्षा भोगलेल्या लालूप्रसाद यादव यांच्यासह 99 जणांविरुद्धच्या प्रकरणात सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने 29 जानेवारी रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता.

चारा घोटाळ्याचे हे प्रकरण सुमारे २३ वर्षे जुने आहे. १९९० ते १९९५ दरम्यान झारखंडमधील डोरंडा येथील कोशागारामधून १३९.३५ कोटी रुपये बेकायदेशीरपणे काढण्यात आले. यापूर्वी लालूप्रसाद यांना चारा घोटाळ्याशी संबंधित चार प्रकरणांमध्ये १४ वर्षांची शिक्षा झाली होती. ही प्रकरणे दुमका, देवघर आणि चाईबासा कोषागारातून पैसे काढण्याशी संबंधित होती. त्याच वेळी, आता लालू प्रसाद यांना डोरंडा ट्रेझरी प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here