बारावीसाठी सवलतीचे गुण मिळणार : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

0
35

मुंबई- दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडास्पर्धा आणि चित्रकलेच्या इंटरमिजिएट परिक्षेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली. कोरोनामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण बाधित होऊ नये यासाठी शालेय शिक्षण विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्यात येत आहेत. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता सातवी व इयत्ता आठवीमध्ये विद्यार्थ्यांचा क्रीडास्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात येऊन त्यांना सन २०२१-२२ या वर्षाकरिता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात येणार आहेत. दहावीच्या विद्यार्थ्याना ज्यांना एलिमेंटरी ड्राईंग टेस्टला बसता आलेले नाही त्यांना यावर्षी इंटरमिजिएट परिक्षेच्या ग्रेटच्या आधारे गुण दिले जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here