जगातील 30 सर्वात सुंदर पर्यटन स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील एकमेव सिंधुदुर्गचा समावेश!

0
73
जगातील 30 सर्वात सुंदर पर्यटन स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील एकमेव सिंधुदुर्गचा समावेश

सिंधुदुर्ग: ‘कोंड नेस्ट ट्रॅव्हलर’ नावाच्या या मॅगझिनने जगातील 30 सर्वात सुंदर पर्यटन स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील एकमेव सिंधुदुर्गचा समावेश केला आहे. जगातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये सिंधुदुर्गचा समावेश असणे ही खरोखरच आपल्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली.या मॅगेझिनने यंदाच्या वर्षी भेट देण्यासाठी जाहीर केलेल्याविविध देशातील ३० स्थळांमध्ये सिंधुदुर्गवासीयांना खूपच आनंद झाला आहे.

लंडन, सिसिली, सिंगापूर यासह इस्तंबूल, इजिप्त, माल्टा, सर्बिया, केपवर्दे अशा आंतरराष्ट्रीय तसेच सिक्कीम, मेघालय, ओरिसा, राजस्थान, गोवा, कोलकाता, भिमताल, केरळमधील आयमानम अशा भारतीय 9 पर्यटन स्थळांत महाराष्ट्रातील एकमेव सिंधुदुर्गचा समावेश केला आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here