प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
मी काय सुरू आहे किंवा काय घडत हे लिहिणार नाही, कारण त्याने काहीच बदलणार नाही. वास्तव हे आपल्या कल्पनेच्या कित्येक पटीने वेगळं असत.आपल्याला जे दिसत तेच खर आहे अस काही नाही. आज कालच्या टीव्ही वर सुरू असलेल्या कार्यक्रमांच्या बाबतीत असच आहे. हे कार्यक्रम निव्वळ मनोरंजन म्हणून पहावेत.यातून शिकण्यासारखं काही असेलच तर हे की बाहेरच्या जगात आपल्याला किती खोटं वावरायचं आहे, कसं खोटं गायच आहे, कसं खोटं कौतुक करायचं आहे, गाणं सोडून इतर गोष्टींचा आधार घेऊन कस मोठ व्हायचं आहे .हे सारं त्यांनी शिकायचं ज्यांना या शर्यतीत राहायचं आहे.
मुळात शर्यत स्पर्धा हे सारं आपल आपल्याशी असत , अस मी नाही बरेच थोर कलाकार सांगून गेले आहेत. पण आज लोकांची मानसिकताच बदलेली आहे अस वाटत. जो टीव्ही वर दिसतो ,गातो, वाजवतो, तो शहाणा, बाकी सारे खुळे.अशी काहीशी समजूत गेल्या काही वर्षात घडताना दिसत आहे. तुम्हाला जर सो कॉल इंडस्ट्री मध्ये यायचे आहे, तर तुम्ही गायक नसलात तरी चालतं, गाणं नाही शिकलात तरी चालतं, पण काहीतरी खोटी कथा तुमच्या पाठीशी हवी. गरीब असलात तर अजूनच उत्तम.या साऱ्या गोष्टीने शो पैसे कमावतो, नाव कमावतो, पण स्पर्धकांची कायमची खोटीच ओळख राहते .आणि मुळात सारेच गायक सारीच गाणी नाही गाऊ शकतं, त्याच्याकडून तशी अपेक्षा करणं सुधा कितपत योग्य? पण आजकाल हे सारं आलच पाहिजे.तुम्ही “versatile ” आहात हे दिसलं पाहिजे.
अजूनही एक मुद्दा आहे पण तो पोस्ट मध्ये लिहिण्यासारखा नाही, त्याने वादाला वळण लागेल. मी स्वतः गाण्याचे व वाजवण्याचे शिक्षण देतो, तेव्हा मी नेहमी सांगतो आजच्या पिढी समोर जे आदर्श आहेत तेच चुकीचे आहेत. आजच्या पिढीने मुळात कुणी काय गायलं , काय लिहिलं, कसं संगीतबद्ध केलं हे पहावं, ऐकावं , नीट समजून घेऊन गाव. जे टीव्ही वर पाहिलं त्यालाच खर न मानता ,काय खर आहे हे पहावं.आणि आता तर खर लगेच सापडू शकत, आपल्याकडे २४ तास इंटरनेट सेवा उपलब्ध आहे, आपण हवं ते शोधून ऐकू शकतो पाहू शकतो.तर किमान ते तरी करावं. आणि ते करताना गाणं असो कुठलही वाद्य असो त्याचं रीतसर शिक्षण घेऊनच कला शिकावी. गुरू शिवाय कुठीलच गोष्ट या जगात साध्य होऊ शकत नाही, आणि अस बघून शिकलेली विद्या जास्त काळ टिकू शकत नाही . ५ मिनट चे गाणे गाऊन लोक तुम्हाला फारफार ५ महिने पण लक्षात ठेवणार नाहीत.तेव्हा खोट्या प्रसिद्धीच्या पाठी न लागता खऱ्या कलेची आस धरावी.सारे शो स्पर्धा या आपल्याला विरंगुळा म्हणून पहाव्यात. त्याचा वास्तवाशी काहीही समंद नाही हे ध्यानात ठेवावे. कारण स्पर्धा हि आपल्याशीच असावी तरच आपण त्यात जिंकू शकतो .
(सदर लेखन हे कोणत्याही एका टीव्ही शो साठी नाही, कुठली व्यक्ती, संस्था किंवा चॅनेल यांना दुखवायचे मनात देखील नाही , त्याचा तसा अर्थ लावू नये-सिद्धेश कुंटे)


