रशियामध्ये युक्रेनवरील हल्ल्याचा निषेध; युद्धाच्या विरोधात लोकांचे आंदोलन तीव्र

0
31

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा आज चौथा दिवस आहे. रशियामध्ये युद्धाच्या विरोधात लोकांचे आंदोलन तीव्र झाले आहे. रशियाची राजधानी मॉस्को, सेंट पीटर्सबर्ग आणि इतर शहरांमध्ये शनिवारी लोक रस्त्यावर उतरले आणि घोषणाबाजी केली. यावेळी 460 जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यात मॉस्कोमधील 200 हून अधिक लोकांचा समावेश आहे.

मॉस्को येथील गॅरेज म्यूझियमने शनिवारी घोषणा केली की, जोपर्यंत यूक्रेनमध्ये हल्ला बंद होत नाही तोपर्यंत म्यूझियम बंद राहील. संग्रहालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा आपण सामान्य असण्याचा गैरसमज पाळू शकत नाही.

रशियाशिवाय जपान, हंगेरी, फ्रान्स, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांतील लोक युक्रेनवरील हल्ल्याचा तीव्र निषेध करत आहेत. ‘युद्ध नको’ अशा घोषणा असलेले पोस्टर घेऊन लोक रस्त्यावर उतरत आहेत आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याकडे हे युद्ध थांबवण्याची मागणी करत आहेत. रशियन पोलिसांनी डझनभर शहरांमध्ये युद्धाच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या 1,700 हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here