भारतीय माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला अटक

0
32
भारतीय माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी

मुंबई- भारतीय माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला रविवारी वांद्रे पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी विनोद कांबळीच्या विरोधात आलेल्या तक्रारीवरुन अटक केली होती. विनोद कांबळीने दारुच्या नशेत कार चालवत वांद्रे येथील एका सोसायटीच्या गेटवर आणि तक्रारदाराच्या गाडीला टक्कर दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी करत अटक केली होती. या प्रकरणाची मुंबई पोलिसांनी दखल घेऊन विनोद कांबळीवर विरोधात गुन्हा दाखल करत अटक केली .त्यांनतर त्याची जामिनावर सुटका झाली.

याआधीही विनोद कांबळी नेहमीच चर्चेत राहिला आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याच्या बँक अकाऊंटमधून पैसे चोरी ला गेले होते.पण सायबर पोलिसांच्या मदतीने त्याचे पैसे परत मिळाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here