सिंधुदुर्ग: इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२२ सायकल मॅरेथॉनमध्ये आमदार वैभव नाईक यांचा सहभाग

0
104
इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२२ सायकल मॅरेथॉनमध्ये आमदार वैभव नाईक यांचा सहभाग

प्रतिनिधी: पांडुशेठ साठम

कणकवली: कणकवली येथील कनक रायडर्स सायकल क्लबच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा सायकल असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली आज इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२२ या सायकल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. या मॅरेथॉनमध्ये २५ किलोमीटर गटात कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सहभाग घेतला होता.आ.वैभव नाईक यांनी कणकवली ते कनेडी असा २५ किलोमीटर परतीचा प्रवास निर्धारित वेळेपेक्षा कमी वेळेत पूर्ण केला. याबद्दल आयोजकांकडून त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जेष्ठ पत्रकार काका करंबेळकर यांच्या हस्ते मेडल व सर्टिफिकेट देऊन आ.वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here