रत्नागिरी- अॅप डाउनलोड करताय? सावधान! तरुणीची ऑनलाइन फसवणूक

0
177
ऑनलाइन गंडा,cyber crime,
गणपतीपुळेतील हाॅटेल व्यावसाईकाची आॅनलाईन सत्तावीस हजाराची फसवणूक

प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर

रत्नागिरी– समस्यांचे निवारण करण्याच्या बहाण्याने ॲप डाउनलोड करण्यास सांगून त्याद्वारे तरुणीची १ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे . ही तरुणी रत्नागिरी शहरातील झाडगाव येथील राहणारी असून , हा प्रकार १ मार्च रोजी दुपारी १२.२० वाजता घडला . याबाबत निकिता संतोष गिरकर ( २७ , रा . जोशी आर्केड झाडगाव , रत्नागिरी ) हिने शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , मंगळवारी दुपारी फ्लिपकार्ट केअर सेंटर संदर्भात येणाऱ्या अडचणीबाबत तिने फोन केला होता . बोलणाऱ्या अज्ञाताने तिला एनी डेस्क ॲप डाउनलोड करण्यास सांगून त्याचा युजर आयडी मागून घेतला . त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून निकिताने आयडी सांगितला . त्यानंतर तिच्या खात्यातून १ लाख रुपये काढल्याचा मेसेज या तरुणीला आला . आपली ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक विनीत चौधरी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here