सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोव्हॉवॅक्सला डीजीसीआयने प्रौढ आणि 12 वर्षांवरील मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. जागतिक चाचण्यांमध्ये नोव्हावॅक्सने 90 टक्के पेक्षा जास्त परिणामकारकता दाखवली आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी या लसीला औषध नियामक प्रशासनाने (DCGI) सोमवारी आपत्कालीन वापरला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता भारतातील लसीकरणाला आणखी वेग मिळणार आहे. याआधी भारतात 15 वर्षांवरील मुलांना लस दिली जात होती. आता 12 वर्षांवरील मुलांना देखील लस देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही भारतात विकसित झालेली तिसरी लस आहे.
आतापर्यंत भारतात फायझर, मोडर्ना, कोविशिल्ड, स्पुतनिक व्ही, कोवॅक्सिन या लसींना मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर आता कार्बेवॅक्स लस लवकरच बाजारात येणार आहे. कोरोनाच्या इतर लसींप्रमाणेच कॉर्बेवॅक्सचे दोन डोस घ्यावे लागतील. मात्र ही लस स्वस्तात उपलब्ध होणार आहे. कार्बेवॅक्स ही लस तयार करण्यासाठी 50 रुपयांपर्यंत खर्च आहे. पण ही लस बाजारात 250 रुपयांत उपलब्ध होईल. बायोलॉजिकल ई कंपनीने सांगितले की, लसीपासून नफा मिळवणे हे त्यांचे लक्ष्य नाही, तर लोकांची सेवा करणे हे आहे. यामुळे, इतर लसींच्या तुलनेत त्याचे दर कमी ठेवले गेले आहेत.


