प्रतिनिधी – पांडुशेठ साठम
शिरगाव: शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिरगाव हायस्कूलच्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी श्रीमती संजीवनी जाधव यांना शिक्षक भरती संघटना, सिंधुदुर्ग यांचे मार्फत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नारी शक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मा रवींद्र जोगल साहेब यांनी भूषविले या कार्यक्रमास शाळेचे मानद अधीक्षक रवींद्र जोगल, शाळा समिती सदस्य शैलेंद्र जाधव, संतोष फाटक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे उपस्थित होते. श्रीमती जाधव यांना शिक्षक भारती जिल्हा सदस्य आकाश पारकर सर, संघटना तालुका अध्यक्ष हेमंत सावंत सर यांच्या उपस्थितीत शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सुचिता कदम मॅडम यांच्या हस्ते मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी श्रीमती जाधव मॅडम यांच्या बद्दल श्रीमती नीलम राणे मॅडम, श्रीमती स्नेहा कांदळगावकर मॅडम, श्रीमती सुमन नाईक मॅडम यांनी आपले विचार मांडले. श्रीमती जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते आपल्या मनोगतात म्हणाले की,”असा पुरस्कार मला माझ्या आयुष्यात पहिला मिळत आहे त्या मुळे या पुरस्काराचे महत्त्व माझ्या साठी खूप मोठे आहे. जीवनात आलेल्या संकटाना मोठ्या समर्थ पणे मी मत करीत माझे काम करत आहे. हे काम करत असताना मला शाळेने ,संस्थेने दिलेली साथ ही माझ्या साठी मोठी शक्ती आहे.” या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री हेमंत सावंत सर यांनी केले तर आभार बी टी पाटील सर यांनी मानले


