प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर
रत्नागिरी- रत्नागिरी पालिकेने घरपट्टी थकवणाऱ्या शहरातील शासकीय कार्यालयांविरुद्ध कडक पावले उचलली आहेत. १८० कार्यालयांची ६० लाख ६६ हजारांची थकबाकी आहे. यामध्ये सर्वांत जास्त जिल्हा शासकीय रुग्णालय, बीएसएनएल कार्यालय, डाकघर कार्यालय, जिल्हा परिषद आदींची आहे.
पालिकेने अंतिम इशारा म्हणून यांना रेडकार्ड दिले असून, थकबाकी भरण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर मात्र कार्यालय सील करण्यात येणार असून, १६ लाखांची घरपट्टी थकविणाऱ्या जिल्हा शासकीय रुग्णालयाला सील ठोकण्याचा पालिका प्रशासनाचा विचार करत असल्याचं समजतंय.


