पंजाब विधानसभा निवडणूक निकालामध्ये आम आदमी पक्षाने अनेक जागांवर बाजी मारत काँग्रेसचा पराभव केला आहे. त्यामुळे पंजाबमधील सत्ताधारी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.पंजाबमधील 117 मतदार संघांपैकी 90 जागांवर आतापर्यंत आपने बाजी मारली आहे.
आम आदमी पार्टी आणि भाजपसाठी खूपच चुरशीची आहे. पण सध्या हाती आलेल्या निकालावरुन आपच्या झाडूने इतर सर्वच पक्षांची साफसफाई केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पंजाबमधील विजयाबद्दल अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत पंजाबच्या जनतेचे आभार मानले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये ‘या क्रांतीसाठी पंजाबमधील जनतेचे खूप खूप आभार.’ असे लिहिले आहे. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी 2017 मध्ये चमकौर साहेब मतदारसंघातून विजयी झाले होते. यावेळेच्या निवडणूकीत त्यांना जोरदार धक्का बसला आहे.


