लांजा प्रतिनिधी: राहुल वर्दे
सांगली येथील कुटुंब देवदर्शनासाठी गणपतीपुळेला जात असताना आंबा घाटातील विसावा पॅईंटच्या पवळणावर कार दरीत कोसळून भीषण अपघात घडला आहे. आज दुपारी दोनच्या सुमारास चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने तीनशे फुटखोल दरीत महींद्रा कंपनीची कार कोसळून झालेल्या अपघातात महिलेसह तीन महिन्याच्या बालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत बालकाचे नाव शिवांश संतोष हरकुडे असून महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.या आधि महीन्याभरापुर्वी स्विफ्ट कारलाही असाच अपघात घडला होता.
सांगली येथील डॉ. हरकुडे व डॉ. फुलारे कुटुंबीय दोन गाड्यांमधून देवदर्शनासाठी गणपतीपुळे येथे निघाले होते. कारमध्ये संतोष हरकुडे (वय ३५) पत्नी सृष्टी (वय ३२) मुलगा शिवांश (वय ३ महिने) मुलगी मन्मिता (वय ३) सागर हरकुडे, पत्नी जयश्री, डॉ. प्रताप तंबाखे (वय ७०) डॉ. संगमेश फुलारे (वय ३) पत्नी डॉ. दीप्ती (वय ३३) मुलगी आज्ञा (वय ६) वर्षे आणि तीन वर्षाचा रेहान प्रणव सुभेदार प्रवास करत होते. विसाव्या पॉइंट वरून निसर्ग सौंदर्य व फोटोग्राफी करुन यामधील एक गाडी गणपतीपुळेच्या (Ganpatipule) दिशेने गेली. मागून आलेल्या कारमधील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट दरीत कोसळली. या अपघाताची माहिती समजताच मुर्शी पोलिस व स्थानिकांच्या मदतीने रेस्क्यू मोहीम राबवली. यामधील जखमी झालेल्या तीन लहान बालकांना दरीतून काढून पुढील उपचारासाठी मलकापूरातील ग्रामीण रुग्णालय व कोल्हापूरातील सीपीआर रूग्णालयात (CPR) दाखल करण्यात आले आहे गाडीत ऐकून 6 जण असल्याची माहिती मिळाली आहे