सिंधुदुर्ग: वेतोरेतील साईबाबा मंदिराचा सोळाव्या वर्धापनदिनाचे १३ मार्चला आयोजन!

0
128
वेतोरेतील साईबाबा मंदिराचा सोळाव्या वर्धापनदिनाचे १३ मार्चला आयोजन!

प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर

वेतोरे येथील देऊळवाडीच्या गुरुकृपा उद्योगालय आवारातील श्री साईबाबा मंदिराचा 16 वा वर्धापन दिन सोहळा रविवारी 13 मार्च रोजी साजरा होत आहे. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आणि अखंड महा प्रसाद यांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी श्रींच्या मूर्तीवर अभिषेक, 10 वा.सत्यनारायण महापूजा, 12 वा.आरती आणि तीर्थ प्रसाद देण्यात येणार आहे. दुपारी 1 वा.पासून रात्री उशिरापर्यंत अखंड महा प्रसाद, सायंकाळी 5 वा.नेरुर(तालुका कुडाळ)येथील बाल भजन होणार आहे.तर सायंकाळी 6 वा.आंदुर्ले (तालुका कुडाळ)येथील ह. भ. प.सदाशिव सुरेश पाटील यांचे कीर्तन होणार असून ,सायंकाळी 9 वा. श्री विठ्ठल रखुमाई भजन मंडळ तेंडोली (तालुका कुडाळ) यांचे भजन आणि रात्रौ 10 वा.खानोलकर दशावतार मंडळाचा पौराणिक नाटय़ प्रयोग होणार आहे. या सर्व धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाना आणि महाप्रसादाला उपस्थित राहण्याचे आवाहन वैभव गोगटे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here