प्रतिनिधी -अभिमन्यू वेंगुर्लेकर
संगमेश्वर- रत्नागिरी- कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटातील गायमुख जवळ गाडी ४०० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघात प्रकरणी कार चालकावर देवरूख पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , संतोष हरकुडे हे त्यांच्या ताब्यातील गाडी (केए३२, झेड ०९४९) घेऊन सांगली वरून गणपतीपुळेच्या दिशेने निघाले होते . गाडी आंबा घाटातील गायमुख जवळ आली असता संतोष हरकुडे यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट चारशे फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात गुरुवारी घडला होता. या भीषण अपघातात शिवांश हरकुडे , सृष्टी संतोष हरकुडे यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात संतोष हरकुडे, दीप्ती फुलारे, प्रताप तपस्ते, रेयान सुभेदार, आद्या फुळारे, तन्मिना हरकुडे हे सहाजण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघात प्रकरणी चालक संतोष नागप्पा हरकुडे यांच्यावर देवरुख पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक विद्या पाटील यांनी दिली आहे . अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव करीत आहेत.


