सिंधुदुर्ग: मालवण बाजारपेठ येथील दलित वस्ती गटाराचे विकास कामासाठी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून लाखोंचा विकासानिधी

0
36

प्रतिनिधी पांडुशेठ साठम

मालवण बाजारपेठ येथील भरड ते कासार व्हाळी दलित वस्ती गटाराचे कामासाठी आमदार वैभव नाईक यांनी (17 लाख 68 हजार 239) निधी उपलब्ध करून दिला आहे. गटाराच्या कामाचे भूमिपूजन आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सुधाकर माणगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.हे काम मंजूर होण्यासाठी युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई तसेच माजी नगरसेविका आकांक्षा शिरपुटे यांनी केलेला पाठपुरावा यशस्वी ठरला.

भूमिपूजन प्रसंगी तालुका प्रमुख हरी खोबरेकर, शहर प्रमुख बाबी जोगी, उपशहर प्रमुख राजू परब, उपशहर प्रमुख किरण वाळके, युवासेना मालवण शहरप्रमुख मंदार ओरसकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजीनगरसेक यतीन खोत, नितीन वाळके , नगरसेविका आकांशा शिरपुटे, सेजल परब, रश्मी परुळेकर, तपस्वी मयेकर, नरेश हुले, उमेश मांजरेकर, शाखाप्रमुख सिद्धेश मांजरेकर, यशवंत गावकर, भाई कासवकर, प्रसाद आडवणकर, स्थानिक सुधाकर माणगावकर, बंटी माणगावकर, हेमंत माणगावकर, केदार देसाई , तुषार मेस्त्री, गुरुनाथ नाईक, अंकित कोवळे, तुषार मेस्त्री आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here