जापानमध्ये 7.3 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर सुमारे 20 लाख घरांचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे.भूकंपाचा केंद्रबिंदू फुकुशिमा भागात सुमारे 60 किमी खोलीवर आढळून आला आहे.जपानच्या वेळेनुसार रात्री 11.36 च्या सुमारास हा भूकंप झाला. जापानने उत्तर-पूर्व भागात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
पानमधील फुकुशिमा आणि मियागी या ठिकाणी देखील भूकंपाचे धक्के बसले आहेत.भारतातील लडाखमध्ये देखील 5.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. जपान मध्ये सुमारे 20 लाख घरांमधील लाईट गेली आहे. धोका टाळण्यासाठी काही भागात वीजपुरवठा खंडित करण्यात आला.


