गुजरात राज्य सरकारने गुरुवारी राज्यात नवीन शैक्षणिक धोरणआखल्याची महत्वपूर्ण घोषणा केली.या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना श्रीमद् भगवद्गीता शिकवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात इयत्ता 6 वी पासून 12 वीपर्यंतच्या मुलांना गीतेचे श्लोक व सार शिकवण्यात येणार आहे. भगवद्गीतेचे मूल्य व सिद्धांत या विद्यार्थ्यांना त्यांची समज व आवडीनुसार शिकवले जाणार आहेत. इयत्ता 9 वी ते 12 वीमध्ये श्रीमद् भगवद्गीता कथा व पाठ म्हणून शिकवली जाणार आहे.शाळेच्या प्रार्थनेत गीतेच्या श्लोकांचा समावेश करण्यात येणार आहे.
नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत राज्यातील सर्वच शाळांतील विद्यार्थ्यांना भगवद्गीतेचे सिद्धांत व मूल्य शिकवण्यात येतील. याशिवाय इयत्ता पहिली व दुसरीसाठी इंग्रजी विषय सुरु करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मुलांना सुरुवातीपासूनच गुजरातीसह इंग्रजीचे धडे मिळण्यास मदत होणार आहे.या वयोगटातील सर्व मुलांसाठी स्टी मटेरियल (प्रिंटेड, ऑडिओ-व्हिडिओ आदी) पुरवले जाणार आहे.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीही या धोरणाचा उपयोग चांगला होईल अशी सरकारची धारणा आहे उपयुक्त आहे.


