पंजाब: आम आदमी पक्षाने दिल्लीतीळ आपल्या चांगल्या आणि लोकहिताच्या दृष्टीने राज्यसरकारची कामे कोणती असावी यावर आखलेल्या महत्वपूर्ण उपाययोजनांमुळे दिल्लीचा विजय तरं हिसकावून घेतलाच पण त्यापाठोपाठ या पक्षाला पंजाबीनेही विश्वास दाखवत भरघोस यश मिळून दिले.आता पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने सत्ता स्थापन केली आहे. ‘आप’चे नेते भगवंत मान यांनी बुधवारी पंजाबच्या 17 व्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
या शपथविधीनंतर मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी भ्रष्टाचाराविरोधात मोठं पाऊल उचललं आहे.त्यांनी ‘पंजाब अँटी-करप्शन हेल्पलाइन’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही 23 मार्च शहीद दिनानिमित्त लाचलुचपत प्रतिबंधक हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे. “यामध्ये एक हेल्पलाइन नंबर जाहीर करण्यात येणार असून हा माझा वैयक्तिक व्हॉट्सअॅप नंबर असेल. संपूर्ण पंजाबमध्ये तुमच्याकडे कोणी लाच मागितली तर नकार देऊ नका. त्याचा ऑडिओ किंवा व्हिडीओ बनवून या नंबरवर पाठवा. माझे कार्यालय त्याकडे जातीने लक्ष देईल. दोषीवर कठोर कारवाई केली जाईल, अशी तुम्हाला हमी देतो.’, असे आवाहन पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यातील जनतेला केले आहे.
‘पंजाबमध्ये यापुढे भ्रष्टाचार चालणार नाही. भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे देखील त्यांनी सांगितले आहे. पंजाबच्या इतिहासात आतापर्यंत असा निर्णय कोणीच घेतलेला नसेल,’ असे देखील मुख्यमंत्र्यांनी निर्णय जाहिर करण्यापूर्वी ट्वीट केले होते.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही ट्वीट करून पंजाबचे नवनिर्वाचित मुख्य भगवंत मान यांच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. ‘


