प्रतिनिधी पांडुशेठ साठम
देवगड: हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था, कराडचे संस्थापक विश्वस्त श्री.सुनिल फडतरे हे आपल्या संस्थेच्या माध्यमातून भक्तीमार्गातील व समाजकार्यातुन काम करणाऱ्या व्यक्तींच्या त्यांच्या बहुमुल्य कामाची दखल घेऊन गेली नऊ वर्षे अक्कलकोट येथे वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट यांच्या माध्यमातून सन्मानचिन्ह देऊन पुरस्कृत करतात.
यावर्षी श्री सुनील फडतरे यांनी श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगडचे संस्थापक विश्वस्त आणि स्वामी भक्त श्री नंदकुमार तुकाराम पेडणेकर यांची श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीप्रसाराची व सामाजिक कार्याची दखल घेऊन वटवृक्ष देवस्थान अक्कलकोटचे अध्यक्ष श्री महेश इंगळे,व समाधी मठातील चोळप्पा महाराजांचे पाचवे वंशज श्री अन्नुगुरूजी यांच्या हस्ते श्री नंदकुमार तुकाराम पेडणेकर यांचा अक्कलकोट भुषण पुरस्कार देऊन गौरव केला. या सोहळ्यास आज अक्कलकोट येथे हजारो स्वामी भक्तांची उपथिती होती. तसेच वटवृक्ष देवस्थान अक्कलकोटचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय स्वामी भक्त श्री महेश इंगळे साहेब व इतर मान्यवरही उपस्थित होते