तालिबाननं काबूल विमानतळाला चारही बाजूने घेराव घातला आहे. तालिबानने सर्व ठिकाणी नाकाबंदी केली आहे. त्यामुळे लोकांची प्रचंड गर्दी विमानतळावर होत आहे. तिथेही तालिबान समर्थक नागरिकांना त्रास देत आहेत.अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारीची तारीख जसजशी जवळ येत आहे. तशी तिथे अडकलेल्या लोकांच्या चिंतेत वाढ होतं आहे.
खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या किमती इतक्या वाढल्या आहेत की, लोकांना उपाशी पोटी विमानतळावर रहावं लागत आहे. अनेक जण चक्कर येऊन पडत असल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र तालिबान लोकांची मदत करण्याऐवजी त्यांच्यासोबत मारहाण करत आहेत. अमेरिका आणि नाटो देशाचे सैनिक अफगाणिस्तानातील नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेत आहेत.
काबुल एअरपोर्टवर पाण्याच्या एका बाटलीसाठी ४० डॉलर्स म्हणजेच ३ हजार रुपये मोजावे लागत आहेत. तर एक प्लेट राइससाठी १०० डॉलर्स म्हणजे जवळपास साडे सात हजार द्यावे लागत आहेत. विशेष म्हणजे विमानतळावर यासाठीचे पैसे डॉलर्समध्येच घेतले जात आहेत.


