Bike- जावा येझदी मोटरसायकलतर्फे नवीन स्टेल्थ ड्युअल-टोन पेराक सादर

0
35
2024 Jawa Perak 1,java42bober,
जावा येझदी मोटरसायकलतर्फे नवीन स्टेल्थ ड्युअल-टोन पेराक सादर २०२४ साठी रोमांचक अपडेट्ससह अत्याधुनिक बॉबर सादर

२०२४ साठी रोमांचक अपडेट्ससह अत्याधुनिक बॉबर सादर

पुणे, भारत :  वर्ष २०२४ साठीची महत्त्वाची घोषणा करताना जावा येझदी मोटरसायकलला आता फॉरवर्ड सेट फूट पेग आणि सुधारित मागील मोनो-शॉक यांसह काळजीपूर्वक  बारकाईने केलेले पितळी  काम असलेली पूर्णपणे नवीन स्टिल्थ ड्युअल-टोन पेंट स्कीम अशी महत्वपूर्ण जावा पेराक सादर करताना आनंद होत आहे. राइडिंगचा अनुभव आणि उत्साही लोकांसाठी उपलब्धता  वाढवण्याच्या  उद्देशाने कंपनीने आपल्या बॉबर श्रेणीमध्ये आणखी सुधारणा केल्या आहेत. जावा 42 बॉबर आता २.०९ लाख रु. (एक्स-शोरूम दिल्ली) आणि नवीन अलॉय व्हील  व्हेरियंटच्या  रोमांचक किंमतीत उपलब्ध आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-चंद्रनगर-शाळेत-निबंधलेख/

भारतीय मोटारसायकल बाजारपेठेतील अग्रगण्य नाव जावा येझदी मोटरसायकल्स जावा पेराक आणि जावा 42 बॉबर या त्यांच्या प्रतिष्ठित मॉडेलसह बॉबर विभागाला पुन्हा परिभाषित करत आहे. या बाइक्सनी भारतामध्ये केवळ चित्तथरारक बॉबर संस्कृती प्रस्थापित केली असे नाही तर अस्सल स्टाइलिंग आणि स्पोर्टी कामगिरीचे कौतुक असलेल्या उत्साही लोकांमध्ये प्रचंड लोकप्रियता देखील मिळवली आहे.

शैली आणि कामगिरी या दोन्हीला प्राधान्य देणाऱ्या रायडर्सच्या आकांक्षा पुऱ्या करत बॉबर्स त्यांच्या अद्वितीय अपीलसाठी प्रसिद्ध आहेत.  जावा पेराक आणि जावा 42 बॉबर या विभागामध्ये अतुलनीय अनुभव देतात. हेरिटेज कलेक्शनमधील 2024 जावा पेराक प्रीमियम बॉबर विभागामध्ये उत्कृष्ट फिट आणि फिनिश, रिफाइंड राइडिंग डायनॅमिक्स आणि पीरियड-करेक्ट स्टाइलिंगसह नवीन मापदंड प्रस्थापित करते.

नवीन जावा पेराक तपशीलाकडे बारकाईने लक्ष देत आकर्षक स्टिल्थ मॅट ब्लॅक/मॅट ग्रे ड्युअल-टोन स्कीम सादर करते. यात सुंदर क्राफ्ट केलेले ब्रास टँक बॅजिंग आणि अस्सल ओल्ड-स्कूल अपीलसाठी इंधन फिलर कॅप आहे. अधिक आरामासाठी क्लासिक शैलीतील क्विल्टेड टॅन सीट हे वैशिष्ट्य आहे. फॉरवर्ड-सेट फूट पेग्सचा 155 मिमी पुढे स्थित, एकूण राइडिंग एर्गोनॉमिक्स आणखी उंचावते.

त्याच्या स्टिल्थी एक्सटीरियर बाह्य भागाअंतर्गत जावा पेराक एक शक्तिशाली 334cc लिक्विड-कूल्ड इंजिनद्वारे समर्थित आहे. सर्वोत्तम अॅक्सीलरेशन आणि ब्रेकिंगसह आनंददायक कामगिरी सुनिश्चित करत ते उत्कंठावर्धक  29.9PS@7500RPM आणि 30Nm@5500RPM तयार करते.  अवघड शहरी प्रवासादरम्यान हलके क्लच अॅक्शन  करण्यासाठी असिस्ट आणि स्लिप  क्लच सह बाईकमध्ये Continental द्वारे ड्युअल-चॅनल ABS आणि मोठे ByBre, डिस्क ब्रेक्स (280mm पुढील आणि 240mm मागील) आहेत. शेवटी, नवीन सात-स्तरीय प्रीलोड ॲडजस्टेबल मोनो-शॉक एक छान आणि आरामदायक राइड सुनिश्चित करते.

जावा 42 बॉबर मूनस्टोन व्हाईट व्हेरियंटची किंमत रु. 2.09 लाख (एक्स-शोरूम दिल्ली) असून दरम्यान, निओ-रेट्रो कलेक्शनमधील जावा 42 बॉबर श्रेणी,  आता अधिक सुलभ आणि व्यावहारिक बनली आहे.

मिस्टिक कॉपर आणि जॅस्पर रेड ड्युअल-टोन व्हेरियंटसह  २०२४ साठी नवीन दोन नवीन ट्रिम असून आता प्रीमियम डायमंड-कट अलॉय व्हीलसह उपलब्ध आहेत. LED लाइटिंग, डिजिटल इन्स्ट्रुमेंटेशन,  यूएसबी  चार्जिंग, एक अॅडजस्टेबल सीट आणि एकाधिक सामान पर्याय यासारख्या आधुनिक वैशिष्ट्यांच्या संपूर्ण संचासह 42 बॉबर फॉर्म आणि कार्यामध्ये एक चांगला समतोल राखतो.

या सादरीकरणाबद्दल भाष्य करताना जावा येझदी मोटरसायकलचे मुख्य कार्यकारी अधिकारी  आशिष सिंग जोशी म्हणाले, “जावा पेराक हे आमच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॉडेल्सपैकी  एक बनले भारताच्या वाढत्या महत्त्वाकांक्षी बाजारपेठेचे हे द्योतक आहे. 42 बॉबरने आमच्या विभागातील वर्चस्वाला आणखी मजबूत केले. बॉबर मानसिकता ही एक मनात रुजलेली गोष्ट असते. ती तुमच्याकडे असते किंवा नसते. तुमच्याकडे आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही त्याची राईडच घ्यावी लागते. जावा पेराकचे नवीन डिझाईन तुम्हाला या अनोख्या बाजूकडे आकर्षित करते!”

जावा 350, जया 42, येझ्दी रोडस्टर, येझ्दी स्क्रॅम्बलर आणि येझदी ॲडव्हेंचरचा समावेश असलेल्या विद्यमान लाइनअपला पूरक जावा 42 बॉबरसह जावा पेराक जावा येझ्दी मोटरसायकलसाठी सध्याचा ‘फॅक्टरी कस्टम पोर्टफोलिओ’ तयार करते. 

जावा पेराक आणि विविध जावा 42 बॉबर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here