Bollywood: ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविणार

0
61
ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविणार

मुंबई: ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो.

68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात 79 वर्षीय आशा पारेख यांना हा सन्मान देण्यात येणार आहे. 2019 मध्ये साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महिलेला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्याची ही 22 वर्षांतील पहिलीच वेळ आहे. गायिका आशा भोसले यांना शेवटचा हा पुरस्कार 2000 साली देण्यात आला होता, त्यानंतर आशा पारेख या पहिल्या महिला आहेत.

आशा पारेख यांना करिअरमध्ये अनेक पुरस्कार मिळाले. ‘कटी पतंग’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार (1970) , पद्मश्री सन्मान (1992), जीवनगौरव पुरस्कार (2002), भारतीय सिनेमांतील उत्कृष्ट कामासाठी आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अकादमी सन्मान (2006), भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंडळ महासंघ (फिक्की)च्या वतीने लिविंग लेजेंड सन्मान मिळाला.

​​दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे.1969 मध्ये दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून हा पुरस्कार दिला जातोय. हा पुरस्कार माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत खात्यातर्फे दिला जातो. प्राप्तकर्त्याचा त्यांच्या “भारतीय चित्रपटांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी केलेल्या उत्कृष्ट योगदानासाठी” सन्मान केला जातो. या पुरस्कारामध्ये सुवर्ण कमळ पदक, एक शाल आणि रोख 10,00,000 रुपये यांचा समावेश आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here