बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार स्टारर आगामी ‘राम सेतू’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट ‘राम सेतू’च्या अस्तित्वाच्या वादावर आधारित आहे. घोषणा झाल्यापासून हा चित्रपट सतत चर्चेत राहिला. हा चित्रपट 25 ऑक्टोबर 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. राम सेतूच्या ट्रेलरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या चित्रपटात अक्षय व्यतिरिक्त जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अक्षय कुमारच्या या मल्टीस्टारर चित्रपटाचा ट्रेलर अॅक्शन, थ्रिलर आणि थ्रिलने परिपूर्ण आहे. अभिषेक शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट 25 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
या चित्रपटाची कथा राम सेतू वाचवण्याच्या मिशनची आहे. चित्रपटात अक्षय एका पुरातत्त्व शास्त्रज्ञाची भूमिका साकारत आहे आमि तो राम सेतू खरा आहे की काल्पनिक आहे याची चाचपणी करत आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्यावर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. ट्रेलर पाहिल्यानंतर नक्कीच चित्रपटाविषयीची तुमची उत्सुकता वाढेल. अक्षय कुमार राम सेतू उद्ध्वस्त करणाऱ्या लोकांशी लढताना दिसत आहे आणि जॅकलीन फर्नांडिस प्रभू रामाचे प्रतीक असलेल्या राम सेतूचे अस्तित्व वाचवण्यासाठी धडपडत आहे.