Breaking: दाभोली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा नगारा वाजला असून मतदारांचा नेमका कौल कुणाला

0
61

गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी आरोपीच्या समर्थकांना लोक स्वीकारतील का?

दाभोली ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२ च्या सरपंचपदासाठी पाच उमेदवार रिंगणातउतरल्याने निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार! विद्यमान सरपंच ,माजी पंचायत समिती सदस्य यांच्यात लढत होणार कि अन्य उमेदवार बाजी मारणार? काही वर्षांपूर्वीं घडलेल्या गंभीर खून प्रकरणातील आरोपींचे समर्थक निवडणूक रिंगणात उतरल्याने मतदारांचा कौल कुणाला?शांतताप्रिय गावात पुन्हा दहशतीचे सावट!

दाभोली ग्रामस्थानीं आवाज उठविण्याची हीच वेळ आहे .आपल्या हक्काच्या गोष्टी कुणी हिरावून घेत असेल तर त्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे.राजकीय धनदांडक्यांच्या पैश्यांच्या हव्यासापोटी गरिबांचे राहते घर लुबाडणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांना निवडणुकीच्या माध्यमातून वेळीच आवर घातला नाही तर वाडवडिलांनी मोठ्या कष्टाने राखलेल्या कोकणातील जमिनींवर राजकारण्यांचे वर्चस्व प्रस्थापित होईल आणि एक दिवस कोकणातील माणूस देशोधडीला लागेल आणि त्याचे सोयरंसुतकही सत्तेच्यालालसेने काम करणाऱ्याना राहणार नाही हे सत्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here