Breaking News : त्या सोने-चांदी व्यापा-याचा खून झाल्याचे पोलीसांकडून उघड

0
20
त्या सोने-चांदी व्यापा-याचा खून झाल्याचे पोलीसांकडून उघड

▪️ अटक आरोपींना अधिक तपासकामी दि.२८/ ०९ / २०२२ रोजी पर्यंत पोलीस कोठडी

प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर

रत्नागिरी

किर्तीकुमार अजयराज कोठारी, वय ५५ वर्षे, रा.बी.विंग, बिल्डींग नं.४ फ्लॅट नं.३०८, इंदिरा कॉम्प्लेक्स, ६० फुट रोड, भाईंदर ( पश्चिम ) जि.ठाणे, पिन ४०११०१ हे सोने – चांदीचे व्यापारी दि.१९ / ०९ / २०२२ रोजी ०९ .१० वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे रत्नागिरी येथे त्यांचे व्यवसायाकरीता आले होते. रत्नागिरीमध्ये आल्यानंतर ते नेहमी श्रद्धा लॉज, आठवडा बाजार, रत्नागिरी येथे रहात असत. किर्तीकुमार कोठारी हे रत्नागिरी येथे आल्यानंतर दि.१९ / ०९ / २०२२ रोजी रात्री ० ९ वाजतापासून त्यांचा मुलगा करण कोठारी हा त्यांच्याशी संपर्क करीत होता. परंतु किर्तीकुमार कोठारी यांच्याशी संपर्क होत नव्हता. तेव्हा करण कोठारी यांनी दि . २१ / ०९ / २०२२ रोजी रत्नागिरी येथे येऊन त्यांचे ओळखीचे मित्र यांच्या मदतीने किर्तीकुमार कोठारी यांचा शोध घेतला. परंतु ते मिळून आले नाहीत. तेव्हा दि. २१ / ०९ / २०२२ रोजी करण कोठारी यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे येऊन, त्यांचे वडील किर्तीकुमार कोठारी हे हरविल्याबाबत दिलेल्या तक्रारीवरुन, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे हरविलेल्या व्यक्तींची नोंद क्र. ५८/२०२२ अन्वये तक्रार दाखल करण्यात आली होती.

सदर तक्रार दाखल झाल्यानंतर लगेचच पोलीसांनी व किर्तीकुमार कोठारी यांच्या नातेवाईकांनी किर्तीकुमार कोठारी हे नेहमी व्यापाराकरीता रत्नागिरीतील ज्या ज्वेलर्स दुकानांमध्ये जात असत, त्या ज्वेलर्स दुकानांचे व आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, किर्तीकुमार कोठारी हे दि. १९ / ०९ / २०२२ रोजी साधारण रात्रौ ०८.३० वाजताचे सुमारास त्रिमुर्ती ज्वेलर्समध्ये गेल्याचे, परंतु दुकान बंद होईपर्यंत तेथून बाहेर न पडल्याचे दिसून आले. तसेच सदर ज्वेलर्स दुकानाचा मालक व इतर दोन अनोळखी व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्या. तेव्हा सदर गोष्ट पोलीसांनी हेरुन व सदरबाबत मा.वरिष्ठ अधिका-यांना कळवून, त्यावर तपास केंद्रीत केला आणि त्रिमुर्ती ज्वेलर्स दुकानाचा मालक भुषण सुभाष खेडेकर, वय ४२ वर्षे, रा. दत्त मंदिर समोर, खालची आळी, ता.जि. रत्नागिरी यास पोलीस ठाणेस आणून किर्तीकुमार कोठारी यांच्या नातेवाईकांसमक्ष त्याचेकडे सखोल चौकशी केली. तेव्हा त्याच्याकडील चौकशीतील माहिती व पोलीसांनी पाहिलेले सीसीटीव्ही फुटेज यामध्ये तफावत दिसून आली. त्यावर पोलीसांनी पुन्हा भूषण खेडेकर याचेकडे किर्तीकुमार कोठारी यांचा घातपात झाल्याच्या दृष्टीने तपास केला तेव्हा भूषण खेडेकर याने पोलीसांना किर्तीकुमार कोठारी यांचा त्याने व त्याचे मित्र महेश मंगलप्रसाद चौगुले, वय ३९ वर्षे, व्यवसाय रिक्षा चालक व बेग फायनान्स, रा. मांडवी , सदानंदवाडी, ता.जि. रत्नागिरी आणि फरीद महामूद होडेकर, वय ३६ वर्षे, रा. भाट्ये, खोतवाडी, ता. जि. रत्नागिरी असे तिघांनी मिळून किर्तीकुमार कोठारी यांना त्रिमुर्ती ज्वेलर्स दुकानामध्येच हाताने व दोरीने गळा आवळून ठार मारले आणि मृतदेह दुकानामध्येच ठेवला. यानंतर रात्री उशिरा पुन्हा तिघांनी त्रिमुर्ती ज्वेलर्स दुकानात एकत्र येऊन, किर्तीकुमार कोठारी यांचा मृतदेह गोणीत घालून तो दुकानातून बाहेर काढून, फरीद होडेकर व महेश चौगुले यांना त्याची कोठेतरी विल्हेवाट लावण्याबाबत सांगितल्यावरुन फरीद होडेकर व महेश चौगुले यांनी तो महेश चौगुले याच्या रिक्षातून नेल्याचे सांगितले.

यावर पोलीसांनी करण किर्तीकुमार कोठारी यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारी वरुन, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गु.र.क्र.३६०/२०२२ भा.दं.वि.सं. कलम ३०२, २०१, १२० ( ब ) अन्वये गुन्हा दाखल केला. पोलीसांनी तात्काळ दाखल गुन्ह्यातील इतर दोन संशयीत आरोपींना ताब्यात घेतले व त्यांच्याकडे किर्तीकुमार कोठारी यांच्याबाबत तपास केला. तेव्हा त्यांनीही भूषण खेडेकर यांच्याप्रमाणेच हकिकत सांगत, किर्तीकुमार कोठारी यांचा मृतदेह महेश चौगुले याच्या रिक्षातून घेऊन जात एके ठिकाणी टाकल्याचे सांगितले. यानंतर पोलीसांनी आणि तिन्ही आरोपींना दाखल गुन्ह्यात अटक केली व तपासादरम्यान आरोपीच्या सांगण्यानुसार किर्तीकुमार कोठारी यांचा मृतदेह भातगांव – आबलोली रोडवरील एका प-यातून तपासकामी ताब्यात घेतला आहे. तसेच अटक आरोपी क्र. १ ते ३ यांना रिमांडकामी मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता, मा. न्यायालयाने अटक आरोपींना अधिक तपासकामी दि.२८/ ०९ / २०२२ रोजी पर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे.

मा. पोलीस अधिक्षक डॉ.मोहित कुमार गर्ग व मा.अपर पोलीस अधिक्षक जयश्री देसाई, श्री सदाशिव वाघमारे-उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याच्या वेगाने तपास करुन गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याची कामगिरी पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले, पोलीस उपनिरीक्षक शांताराम महाले व आकाश साळुंखे, सहाय्यक पोलीस फौजदार हरचकर, पोलीस हवालदार जयवंत बगड, प्रविण बर्गे, गणेश सावंत, पोलीस नाईक वैभव शिवलकर, दिपराज पाटील, आशिष भालेकर, पंकज पडेलकर, अमोल भोसले, मनोज लिंगायत, मंदार मोहीते, प्रविण पाटील, विलास जाधव, पोलीस हवालदार चालक केतन साळवी, विशाल आलीम, सी.डी.आर. विंग विभागाचे पोलीस नाईक रमिज शेख व निलेश शेलार यांनी केलेली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विनित चौधरी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here