कुडाळ– येथील उद्योजक चंदू पटेल यांच्यावर दोघांनी प्राण घातक हल्ला केला आहे. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. हा प्रकार आज रात्री उशिरा कुडाळ पोलीस ठाण्यासमोरच घडला. https://sindhudurgsamachar.in/kokhapur-पश्चिम-महाराष्ट्राला-क/
दरम्यान, हल्ला करणारे संशयित पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. जखमी पटेल यांना कुडाळ येथील सामाजिक कार्यकर्ते तथा मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, भाजपच्या संध्या तेरसे,आनंद बांदिवडेकर,लालू पटेल यांनी अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. नेमका हल्ला कशासाठी झाला याचे कारण कळू शकले नाही. पोलीस अधिक तपस करत आहेत.

