Coid19- राज्या कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा झपाट्याने वाढ; नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन

0
140

राज्यावर पुन्हा कोरोनाचे सावट आहे. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. सरकारकडून  वारंवार नागरिकांना मास्कचा वापर करा असे आवाहन केले जात असून उपाययोजना आखण्यास सुरुवात झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये कोरोनाने वेगाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. मुंबईकरांसाठी ही धोक्याची घंटा आहे. या ठिकाणी कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. जूनच्या पहिल्या चार दिवसांमध्येच मुंबईत कोरोना रुग्णांचा मोठा आकडा समोर आला आहे

मुंबईमध्ये राज्याच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजेच 3,095 रुग्ण आढळले आहेत. ही चिंतेची बाब आहे. कारण मार्च महिन्यामध्ये 1,519 रुग्ण, एप्रिलमध्ये 1,795 रुग्ण तर मे महिन्यामध्ये 5,838 रुग्ण आढळले होते. ही आकडेवारी पाहता. मार्चच्या तुलनेत जूनच्या चार दिवसांची आकडेवारी ही दुप्पट आहे. तर एप्रिल आणि मे महिन्याची आकडेवारी पाहिली तर फक्त जूनच्या चार दिवसांची आवडेवारी ही जास्तच आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब आहे.

राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकऱ्यांनी सांगितले की, ‘सध्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे आणि आपल्याला सावध राहण्याची गरज आहे. पण ही कोरोनाची चौथी लाट नाही.’ दरम्यान, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबईकरांनी आता तरी स्वत:ची आणि कुटुंबियांची काळजी घ्यावी आणि मास्कचा वापर करावा असे आवाहन केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here