कोरोना महामारीच्या वाढत्या रुग्णांमुळे देश लॉकडाऊन मध्ये होता.महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण होते. या आठवड्यात रुग्णांची संख्या कमी झाली म्हणून संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक करायला सुरुवात केली आहे.मुंबई अनलॉक होताच मुंबईकर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसले.मुंबई लोकलमध्ये गर्दी कंट्रोल करण्यासाठी रेल्वेने सोमवारी विशेष ड्राइव्ह सुरू केली आहे. जेणेकरुन केवळ आवश्यक सेवांसंबंधीत लोकांनाच प्रवास करता येईल. मात्र अनलॉकच्या पहिल्या दिवसासारखी परिस्थिती मुंबईमध्ये पाहायला मिळाली. ज्यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो.
अनलॉक करताना त्यामुळे काळजी घ्या. एकदम काहीही शिथिल केलेले नाही. त्यासाठी काही निकष आणि पातळ्या ठरवल्या आहेत. स्थानिक पातळीवर जीक्ळ प्रशासन निर्बंध किती शिथिल करायचे किंवा कडक याबाबत निर्णय घेतील.मुंबईतील महत्त्वाच्या चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होता. यामुळे मुंबईतील इस्टर्न व वेस्टर्न एक्सप्रेस वे वर वाहनांच्या मोठ्याप्रमाणावर रांगा पहायला मिळाल्या.बसमध्ये जेवढे सीट आहेत तेवढेच लोक एका वेळी प्रवास करु शकतात. कोणालाही उभे राहुन जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.त्यामुळे लोकांनी काळजी घेऊन पुन्हा कॉरोन पसरणार नाही याची काळजी घ्या.