Covid 19:गेल्या 24 तासात देशात 1 लाख 59 हजार 424 नवे कोरोना रुग्ण! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावली तात्काळ उच्चस्तरीय बैठक

0
91

दिल्ली: गेल्या 24 तासात देशात 1 लाख 59 हजार 424 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापुर्वी शुक्रवारी 1 लाख 41 हजार 986 रुग्ण आढळले होते. तर गुरुवारी 1 लाख 17 हजार 100 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. देशात आतापर्यंत 3.55 कोटी जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 3.44 कोटी जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील विविध भागात सध्या 5 लाख 84 हजार 580 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तिसऱ्या लाटेत आज पहिल्यांदा 1.50 लाख नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत काही मोठे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशात सध्या रुग्ण सक्रिय होण्याचे प्रमाण वाढले असून, पॉझिटिव्ह रेट हा 10 इतका आहे. त्यामुळे या बैठकीत लॉकडाऊन तसेच काही निर्बंध देखील लादले जाऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here