Covid 19 – चीनमध्ये कोरोनाच्या अतिशिघ्र पसरणाऱ्या BF 7 चा हौदोस

0
145
चीनमध्ये कोरोनाच्या अतिशिघ्र पसरणाऱ्या BF 7 चा हौदोस

बीजिंग– चीनमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन या स्ट्रेनच्या, प्रामुख्याने BA.5.2 आणि BF.7 या स्ट्रेनने सध्या चीनमध्ये हौदोस घातल्याचे दिसून येत आहे. पेकिंग युनिव्हर्सिटी फर्स्ट हॉस्पिटलचे श्वसन तज्ज्ञ वांग गुआंगफा यांनी चेतावणी दिली आहे की बीजिंगमध्ये पुढील पंधरवड्यात गंभीर COVID-19 प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे शक्यता आहे.चीनमध्ये आलेल्या या लाटेने डॉक्टर आणि आरोग्यव्यवस्थेवरचा ताण वाढला आहे. बीजिंगमध्ये ओमिक्रॉन विषाणूच्या BF.7 प्रकाराचा फटका बसला आहे, हा सर्वात वेगाने पसरणारा कोरोनाव्हायरस असल्याचे म्हटले आहे.चीनच्या राजधानीत यामुळे हाहाकार उडाला आहे रुग्णालयांमध्ये प्रचंड गर्दी झाली आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सागरी-मत्स्यव्यवसाय-नौ/

बर्‍याच चिनी फार्मास्युटिकल कंपन्या सर्दी आणि तापाच्या औषधांची मागणी पूर्ण करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्या आहेत आणि सरकारी माध्यमांच्या वृत्तानुसार, सरकार आणि कंपन्यांनी केलेल्या विविध उपाययोजनांमुळे ओषाधांचा तुटवडा कमी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here