कोविड -19 चे संक्रमण देशात आणि त्यातील खेड्यापाड्यात पसरले आहे. या रोगाशी झगडताना लोकांना दर दिवशी नवीन नवीन प्रकारच्या अडचणीना सामोरे जावे लागत आहे. कोरोनाच्या उपचारादरम्यान बरीच औषधे दिली जात आहेत. यामध्ये स्टिरॉइड्स,रक्त पातळ काण्याची इंजेकशन्स तसेच रेमिडिसियर सारखी काही औषधे दिली जात आहेत. यामुळे मधुमेह ,उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांमध्ये नवीन आजार दिसत आहेत. मुकेरमयकॉसिस सारख्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागत आहे.
त्यातच रुग्णालयातून कोरोना आजारातून बाहेर आल्यानंतर बऱ्याच रुग्णांना हृदयाचे आजार झालेले दिसत आहेत. यामध्ये काही जणांचा मृत्यू होत असल्याने लोकांमध्ये सर्वच बाबतीत भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्वात भर म्हणजे सोशल मीडियावर प्रत्येक जण आपल्या पद्धतीची उपचार पद्धती सांगून लोकांना अजूनच गोंधळात टाकत आहेत.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते कोरोनातून बाहेर पडल्यावर रक्ताच्या गाठी होऊ शकतात पण असे सगळ्याच रुग्णांच्या बाबतीत होते असे नाही. रिकव्हरी दरम्यान खबरदारी घेतल्यास रुग्णाच्या जीवाला धोका राहत नाही. ज्या लोकांना आधीच हृदय रोग किंवा मधुमेह आहे त्यापैकी 5% लोकांना हार्टअटॅक येण्याचा धोका आहे. परंतु सर्वात जास्त नुकसान तरूणांचे होत आहे.
कोविड-19 मधून बरे झाल्यानंतरही लोकांना हृदयरोगाचा सामना करावा लागत आहे?
कोविड-19 च्या प्राणघातक दुसऱ्या लाटेत ज्यांना पूर्वी हृदयाशी संबधित कोणताही आजार नाही किंवा लक्षणे दिसून येत नसल्यामुळे या आजाराची जाणीव होत नाही अथवा समजत नाही. काही रुग्णांना हृदयविकाराचा कोणताही आजार नसतानाही हार्टअटॅक आल्याचे निदर्शनास आले आहे. तरुण रूग्णांमध्ये, फुफ्फुसातील आवरणात पाणी वाढल्यामुळे सूज येते आणि श्वास घेण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे रेस्पिरेटरी ऑर्गन काम करणे थांबवतात.कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये फुफ्फुसातील फायब्रोसिस हेही एक लक्षण आहे.यामुळे श्वास घेण्यासदेखील त्रास होऊ शकतो. ज्यामुळे ऑक्सिजन सॅच्युरेशनवर परिणाम होतो.
त्याचप्रमाणे हृदयाच्या आवरणाला आणि स्नायूंना सूज येते.यालाच मायोकार्डिटिस असे म्हणतात. त्यामुळे रुग्णाच्या जगण्याची शक्यता फार कमी होते. ज्या रुग्णांना आधीच हृदयविकार आहे त्यांच्यामध्ये कोविड-19 मधून रिकव्हर झाल्यानंतर हृदयात सूज आणि रक्ताच्या गाठी होण्याची शक्यता वाढत आहे.
छातीत दुखणे हे कोविड-१९ शी संबंधित हृदयविकाराचे लक्षण आहे का?
होय. कोरोना ग्रस्त रूग्णांमध्ये छातीत दुखणे ही आता सामान्य तक्रार झाली आहे. ज्यांना सौम्य लक्षणे आहेत, तेसुद्धा छातीत दुखल्याचे सांगत आहेत. कोविड संसर्ग वेगवेगळ्या लोकांमध्ये सौम्य, मध्यम किंवा तीव्र अशा स्वरूपाचा असू शकतो.
कोरोनामधून रिकव्हर होताना अनेक लक्षणे समोर दिसत आहेत.
– कोणत्याही गंभीर आजाराप्रमाणेच कोरोनानंतर थकवा येणे हे एक सामान्य लक्षण आहे.
– लोकांना श्वास घेण्यात त्रास होऊ शकतो,
– छातीत दुखणे, भीती वाटणे,धडधड जाणवते.
-या सर्व समस्या हृदयरोगाशी संबंधित असू शकतात.
परंतु फार गंभीर आजारी पडल्यानंतरचे इफेक्ट्स, बराच काळ निष्क्रिय राहणे आणि बरेच आठवडे अंथरुणावर झोपणे हे कारण देखील असू शकते.कोरोना रुग्णांना थरथरणे, अशक्तपणा येणे, छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास अडचण येते असेल तर हे हृदयरोगाचे लक्षण असू शकतात.
कोरोनानंतर ह्रदयाशी संबंधित काही लक्षणे दिसल्यास काय करावे?
लक्षणे गंभीर असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला जातो.
ऑक्सिजन सॅच्युरेशनची पातळी 90% पेक्षा कमी होत नाही ना यावर लक्ष ठेवणे.