Covid19:ओमिक्रॉन व्हेरिएंट 16 तासांपेक्षा जास्त काळ राहातो जिवंत !

0
187

ओमिक्रॉनबद्दल नवीन माहिती समोर आल्याने जरा काळजीचे वातावरण सगळीकडेच दिसत आहे. हाती आलेल्या नवीन महतीनुसार कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट कोणत्याही प्लास्टिकच्या वस्तूवर तब्बल 8 दिवस जिवंत राहू शकतो. इतकेच नाही तर मानवी त्वचेवर ओमिक्रॉनचे विषाणू 21 तास जिवंत राहातो. कोरोना व्हायरसचे याआधीचे व्हेरिएंट अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा मानवी शरीरावर फार काळ जिवंत राहात नव्हते असे संशोधकांच्या अभ्यासात त्यांना आढळून आले आहे.

जापानमधील क्योटो प्रीफेक्चुरल यूनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिनच्या डॉक्टरांनी सांगितले, की ओमिक्रॉन व्हेरिएंटमध्ये सर्वात जास्त पर्यावरणीय स्थिरता आढळून आली आहे. म्हणजेच तो वातावरणात जास्त काळ टिकून राहू शकतो. कदाचित त्यामुळेच जास्त काळ जगण्याच्या कदाचित त्यामुळेच जास्त काळ जगण्याच्या क्षमतेमुळे त्याचा पसार झपाट्याने होत आहे.ओमिक्रॉन व्हेरिएंट प्लास्टिकवर सुमारे 193.5 तास म्हणजेच जवळपास 8 दिवस जिवंत राहू शकतो.प्लास्टिक वस्तू आणि मानवी त्वचेवर अल्फा, बीटा, डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरिएंट सुरूवातीला वुहान स्ट्रेनच्या तुलनेत दुप्पट म्हणजेच 16 तासांपेक्षा जास्त काळ जिवंत राहतात

जागतिक आरोग्य संघटनेच्या (Who) शिफारसीनुसार, नागरिकांनी ओमिक्रॉनला गांभिर्याने घेऊन वारंवार हात धुणे, सॅनिटीझर वापरणे,मास्क वापरणे, बाहेरून आल्यावर आंघोळ करणे या सर्व गोष्टीची काळजी घ्यायला हवी आहे विशेषकरून हातांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्षदेणे आवश्यक आहे.याबरोबरच प्रोटीनयुक्त खाण्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.अल्कोहोल-आधारित हँड सॅनिटायझरच्या संपर्कात आल्यानंतर 15 सेकंदात त्वचेवरील कोरोनाचे सर्व प्रकार पूर्णपणे निष्क्रिय होतात, अशी माहिती देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here